वसुलीच्या नावाखाली वॉटर ग्रीडचे पाणी बंद करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताला तात्काळ निलंबित करा -- माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक

वसुलीच्या नावाखाली वॉटर ग्रीडचे पाणी बंद करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताला तात्काळ निलंबित करा -- माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक

होळी, धुलीवंदन, रमजान सारख्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर रझाकारी खपवून घेणार नाही - माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक ; मतदारसंघातील ९० गावांच्या पाण्यासाठी धावून आले आमदार लोणीकर; गोदावरी खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकालाशी बोलून पाणी सुरू करण्याच्या दिल्या सूचना

परतूर विधानसभा मतदारसंघात तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली मराठवाडा वॉटर ग्रीड ची सुरुवात परतुर मंठा विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली आणि ते काम माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जातीने लक्ष घालून वॉटर ग्रिड योजना पूर्णत्वाकडे नेली आणि आज रोजी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून सदरील योजनेचे पाणीपुरवठा वसुलीच्या नावाखाली बंद करण्यात आला होता हे बाब माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास येताच क्षणी त्यांनी गोदावरी पाटबंधारे चे संचालक व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना धारेवर धरत मराठवाडा वॉटर ग्रीन योजनेचे पाणी तात्काळ सुरू करण्याचे सूचना दिले आहेत याबाबत तालुक्यातील 90 गावांसाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर धावून आल्याची चर्चा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
 
वसुलीला आमचं सहकार्य मात्र रझाकारी खपवून घेणार नाही
 
इजरायलच्या धर्तीवर महत्वकांक्षी असलेल्या योजने बाबत मी वेळोवेळी लक्ष देऊन ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचा अहवाल आणि माहिती देऊन अभियंते परतूर मंठा विधानसभा व जालना तालुक्यातील काही भागातील व विशेष करून परतूर,मंठा शहराचा पाणी पुरवठा खंडित करीत आहे...
पालिका प्रशासन व ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन जनता दरबार घेऊन वसुली करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे मात्र वसुलीच्या नावाखाली रझाकारी खपवून घेतली जाणार नसल्याचेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
 
 
अधिक्षक अभियंता यांना खडसावून पाणी सुरळीत करण्याच्या सूचना
 
परतूर,मंठा या दोन मोठ्या शहरांसह ९० गावांचा पाणी पुरवठा मागील काही दिवसापासून खंडित करण्यात आला असल्याची बाब निदर्शनास येताच गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक व पाटबंधारे विभागाने अधीक्षक अभियंता यांना धारेवर धरत मराठवाडा वॉटर ग्रीडचा पाणी पुरवठा तत्काळ सुरू करण्यात याव्यात अशी भूमिका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे.
 
धुलीवंदन,रमजान सणासुदीच्या दिवसात पाणी करून जनतेला वेठीस धरू नका
 
हिंदू धर्मातील महत्वाच्या सणा पैकी एक सण म्हणजे धुलीवंदन व रमजान या दोन सणाच्या पार्श्वभूमीवर रझाकारी करून पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर चांगलेच तापले असल्याचे विधानभवन परिसरात दिसून आले आणि त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा विषय विधानसभेच्या अभिवेशनात पटलाव घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत केल्याचे बोलले जात आहे
 
परतूर,मंठासह ९० गावासाठी आमदार लोणीकरांची तळमळ
 
इजराइलच्या धर्तीवर महत्वकांक्षा असलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यशस्वीरित्या कार्यान्वित व्हावी यासाठी मागील अनेक वर्षापासून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत असताना अचानक अधून मधून मराठवाडा वॉटर ग्रिडचे ग्रिडचा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे खंडित होत असल्याने आमदार बबनराव लोणीकर आक्रमक भूमिका घेत वेळोवेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तालुक्यातील परतूर नगरपरिषद मंठा नगरपंचायत यांच्यासह मतदारसंघातील 90 गावांसाठी धावून येऊन खंडित झालेला पाणी पुरवठा सुरळीत करून घेतात अशी प्रतिक्रिया जनसामान्य जनतेतून व्यक्त होतांना दिसत आहे.

LatestNews

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ई-बाईकचा पर्याय; मंत्रिमंडळ निर्णय
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास
करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी; उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस