जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची काही राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक; ‘या’ राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष-प्रतिनिधींना निमंत्रण का दिले नाही?
जालना । प्रतिनिधी - मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर काही मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत गुरुवार (दिनांक 19) रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात, बैठक संपन्न झाली. या बैठकीस देशातील राष्ट्रीय पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष अथवा प्रतिनिधींस निमंत्रण का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणकोणत्या पक्षास निमंत्रण दिले व अधिकृत तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय काही पक्षांना का वगळण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे तसेच झालेली बैठक रद्द करून पुन्हा नव्याने सर्व पक्षीय निमंत्रण देऊन बैठक घ्यावी. अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी सिपोराकर यांनी युवा आदर्श बोलतांना केली आहे.
यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. 18 मार्च, 2025 रोजीची विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्येबाबत माहिती देण्यात आली. यावेळी बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावे वगळण्या ची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे बाबत सुचना केल्या. जालना शहरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीबाबत, जालना शहरातील ब-याच मतदारांकडे मतदार ओळखपत्र हे चढ सिरिज (जुने) असल्याने त्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये शोधतांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून येत नाहीत, तेव्हा निवडणूक आयोगाने अशा सर्व संबधीत मतदारांना नवीन मतदार ओळखपत्र देण्यात यावे अशी विनंती केली. मतदार यादी वाटपाबाबत, वयाची 18 वर्ष पूर्ण असलेल्याा नवविवाहीत तरुणींना मतदार यादीत नाव नोंदणी करतांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रा समवेतच लग्नत पत्रिका मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पूरावा म्हाणून ग्राहय धरण्याीबाबत विनंती केली. निवडणूक काळात विविध राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी विकसीत केले जाणारे अॅप्सग यांना मतदारांची माहितीच्यात तपशीलाचा स्त्रोनताबाबत माहिती विचारली. मतदारांच्या मतदार यादीतील नावाबाबत व अन्यी तपशीलाबाबत गोपनीयता बाळगण्याोत यावी यासह अन्य विषयाबाबत विषयावर यावेळी चर्चा झाली.लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1950, लोक प्रतिनिधीत्व. अधिनियम 1951,मतदार नोंदणी अधिनियम 1960 यानुसार व भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्तच होणा-या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व कामकाज पार पाडले जाते. मुख्यन निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या अधिकृत वेबसाईटवर जावून मतदार, राजकीय पक्ष/उमेदवार, भारत निवडणूक आयोगाचे विविध अॅप्सा, मतदारांसाठी मदत व सहायता, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विषयक माहिती, निवडणूक प्रक्रिये संबंधित माहिती, भारत निवडणूक आयोगाने विकसीत केलेले आयसीटी अॅप्लीमकेशन्सक, स्वीणप जनजागृती विषयक माहिती, भारत निवडणूक आयोगाची प्रकाशने याबाबत माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्याप निर्देशानुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै आणि 01 ऑक्टोबर या दिनांकावर आधारीत मतदार नाव नोंदणी करण्यायत येते याबाबतची माहिती उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिली.

About The Publisher
