मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम

बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.

श्री.कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कै. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटूंबियांच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर श्री. कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली.

बीड तरुंगात कैदेत असणारा या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अतिविशिष्ट दर्जा (VVIP) प्रमाणे वागणूक तुरूंगातील अधिकारी देत आहेत असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असून कराड आणि त्याच्या सहकारी अरोपींना इतर कारागृहात हलविण्याबाबत कार्यवाही संदर्भात बोलेन असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आलो आहे. या अतिशय निर्घुण हत्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही व आरोपीला फाशीच होईल या पद्धतीने आपण या प्रकरणाकडे पाहत आहोत, असेही श्री.कदम यावेळी म्हणाले.

Read More भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम

LatestNews

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य 
समर्थांची साधना
सात दिवसांत चौकशी करून कारवाई - उपअधिक्षक आयुष नोपाणी ;  इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन 
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल; चौकशी समिती गठित
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम