जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नृत्यांनी उपस्थितांनी मने जिंकली; जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत व प्रयत्नांची गरज – रायठ्ठ्ठा
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत व प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुनील रायठ्ठ्ठा यांनी येथे केले. श्री. म. स्था.जैन माध्यमिक […]
जालना । प्रतिनिधी – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत व प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुनील रायठ्ठ्ठा यांनी येथे केले. श्री. म. स्था.जैन माध्यमिक विद्यालयात ‘नृत्यगंध’ वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून श्री रायठ्ठ्ठा बोलत होते.
पुढे बोलतांना सुनिल रायठठ्ठा म्हणाले की, उद्योगपती होण्यासाठी आपण सर्वांनी काय केले पाहिजे, कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे हे सांगितले. मेहनतीच्या व प्रयत्नाच्या बळावर आपण प्रत्येक बाब मिळवू शकतो असे सांगितले. तसेच जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
अरून मोहता यांनी प्रेरणादायी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. धरमचंद गादिया, जीतेश भायानी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.


About The Publisher
