मुंबई - १६ डिसेंबर ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत छ. संभाजीनगर व बीड केंद्रातून नाट्यरंग, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या चकवा चांदण या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यांकुर, जालना या संस्थेच्या घोळमटन या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे छ. संभाजीनगर व बीड केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
रंगफौजी सामाजिक आणि संस्कृत प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या अल्पभुधारक या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक रोहित देशमुख (नाटक-चकवा चांदण), द्वितीय पारितोषिक सुमित शर्मा (नाटक- घोळमटन), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक शिवकुमार जाधव (नाटक- चकवा चांदण), द्वितीय पारितोषिक वाल्मिक जाधव (नाटक- युगयात्रा), नेपथ्य: प्रथम पारितोषिक औदुंबर वानखेडे (नाटक-अल्पभुधारक), द्वितीय पारितोषिक संजय मारणे (नाटक- पारध), रंगभूषा : प्रथम पारितोषिक वर्षाराणी कोळवले (नाटक- घोळमटन), द्वितीय पारितोषिक कविता दिवेकर (नाटक- युगयात्रा) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक विक्रांत भालेराव (नाटक चकवा चांदण) व निकीता मांजरमकर (नाटक- चकवा चांदण), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रसिका भातखेडकर (नाटक- कारखाना), साधना विटोरे (नाटक- रंग), याज्ञसेनी पाठक (नाटक-अचानक), नेहा साबळे (नाटक- द अॅनॉमली), नंदु वाघमारे (नाटक- अल्पभुधारक), शिवाजी डोळसे (नाटक- युगयात्रा), सतिश लिंगडे (नाटक- घोळमटन), गणेश जिवरख (नाटक- पारध)
दि. २५ नोव्हेंबर, २०२४ ते १२ डिसेंबर, २०२४ या कालावधीत तापडिया नाट्यमंदिर, छ. संभाजीनगर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सुधाकर पाटील, प्रमोद अत्रे आणि श्रीमती प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.