घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्या 9 हॉटेल चालकांवर कारवाई; जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई; घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर जप्त
जालना । प्रतिनिधी - जालन्यात व्यवसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्या 9 हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आलीय. जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ही कारवाई केलीय. या कारवाईत घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने जप्त केलेत. जालना शहरात काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी व्यवसायिक गॅस सिलिंडर ऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याची माहिती जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती. त्या माहितीवरून आज दि.18 मंगळवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने कारवाई करून 17 घरगुती वापराचे गॅस सिलिंडर जप्त केलेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्या 9 हॉटेल चालकांवर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली.


About The Publisher
