देशातील युवा परदेशात जातोय... हे थांबलं पाहिजे - सपा राज्य उपाध्यक्ष जोशी; आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - देशातील युवा हा परदेशात जात आहे. या युवकांना आपल्या देशात शिक्षण आणि रोजगाराबाबत साशंकता आहे. याचाच अर्थ त्यांना भारत देश हा चांगला नसल्याचे जाणवते, हे थांबलं पाहिजे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर जोशी पाटोदेकर यांनी येथे केले.
यावेळी पुढे बोलतांना श्री जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातून परदेशात जाणारे युवकांची मानसिकता भारत हा देश चांगला नसल्याची आहे, येथे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न आहेत. त्याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. अशा वेळी अमेरिकेत गेल्यावर डॉलरच्या माध्यमातून चांगली कमाई करता येईल असे ध्येय बाळगून हे युवक त्या दिशेने जात आहेत. भारतातून जवळपास तीन कोटी युवक हे परदेशात आहेत. याला हे सरकार आणि शासन जबाबदार आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. आणि त्यासाठी समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन देशात आणि राज्यात समाजवादी विचारांचे सरकार आणणे गरजेचे आहे. सध्या समाजवादी पक्ष देशात तिसर्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पक्षाचे देशात 38 खासदार आहेत. याला नंबर वन वर घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावून निवडणुकीत उतरावे जास्तीत जास्त जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एक होऊन प्रयत्न करावे असा सल्ला देखील त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव शेख मुजिबुद्दीन तर आभार परतूर शहराध्यक्ष श्री घनपटे यांनी मानले. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रो. साबेर, शेख जहिर, इम्रान खान, सलमान खान, शेख इद्रीस, लाला कुरैशी, अझरुद्दीन, अफरोज पठाण, नारायण पाटील, साहेबराव कडाळे, शेख अब्बास, शेख मोहसिन, शेख अकबर, इरफान बेग मिर्झा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Publisher
