आदिती अर्बन बँकेवर डल्ला मारणारे बँकेचेच कर्मचारी, बनावट सोने तारण कर्ज प्रकरण उघड होऊ नये म्हणून रचला होता बँक लुटण्याचा कट; पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांची माहिती
जालना । प्रतिनिधी - शहरातील जुना मोंढा परिसरात असलेल्या आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह के्रडीट सोसायटी लि. बुलढाणा जालना शाखेच्या बाँकेचे शटर लॉक तोडुन लॉकरमधील 11 लाख 56 हजार रोख रक्कमेसह 19 लाख 76 हजार रुपये किमतीची ग्राहकांनी तारण ठेवलेले 247 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांवर उल्ला मारणारे आरोपी हे बँकेतील कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. तीन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात सोमवार (दि 4) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. बनावट सोने तारण कर्ज प्रकरण उघड होऊ नये म्हणून त्यांनी बँक लुटण्याचा कट रचला असल्याचेही पोलीस अधिक्षक बन्सल यांनी यावेळी सांगितले.
Advertisment
गुन्हयातील आरोपी नामे ।) गोवर्धन विष्णु सवडे, वय-22 वर्ष, व्यवसाय-रोखपाल, (कॅशिअर), रा. बाजीउम्रद, ता.जि. जालना 2) लक्ष्मण नारायण डोंगरे, वय-26 वर्ष, व्यवसाय-बैंक लिपीक, रा. मौजपुरी, ता.जि. जालना 3) जगदीश आनंता लोलेवार, वय-21 वर्ष, व्यवसाय-बँक शिपाई रा. लक्ष्मीनारायणपुरा, जालना यांच्या ताब्यातुन गुन्हयातील रोख रक्कम रु.9,93,000/- व रु.8,86,000/- किं. चे दागिने असा एकुण रु. 18,79,000/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ बारवाल, भा.पो.से., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, सपोनि. यागेश उबाळे, सपोनि. आनंदसिग साबळे, पोउपनि. शैलेश म्हस्के, स्था.गु.शा.चे पोउपनि, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे, ईरशाद पटेल, सतिष श्रीवास, आकुर धांडगे, देविदास भोजने, व सदर बाजार पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, नजीर पटेल, अजीम शेख, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, राहुल कटकम, यांनी केली आहे.
स्थागुशाखेचे पंकज जाधव यांची थोपाटली पाठ
आदिती अर्बन बँक गुन्हा प्रकरणातील आरोपींना अवघ्या तीन ते चार तासात ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह पथकातील अधिकारी-कर्मचार्यांंची स्तुती करत शाबासकी दिली. त्यांना या गुन्ह्याची उकल केल्याप्रकरणी रिवार्ड, प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही एसपी बन्सल यांनी सांगितले.
सीसीटीव्ही; ऑनलाईन बॅकअपची व्यवस्था करा; बँकांना पोलीस अधिक्षकांचे आवाहन
आदिती अर्बन बँके प्रकरणात आरोपीतांना बँकेतील सीसीटीव्हीसाठी असलेला डिव्हीआर गायब केला. डिव्हीआर गायब केल्याने तपासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अर्बन बँक, पतसंस्था व इतरांनी सीसीटीव्ही लावल्यानंतर ऑनलाईन बॅकअपची व्यवस्था करावी असे आवाहन यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे. किमान गेल्या चार-पाच दिवसांचे अथवा आठवडाभराचे ऑनलाईन बॅकअपची व्यवस्था झाल्यास डिव्हीआर चोरी केल्यास अथवा डॅमेज केल्यास ऑनलॉईन बॅकअपमुळे चोरट्यांचा शोध घेणे सोपे होईल. यासंदर्भात बँक मॅनेजर व व्यापार्यांना या ऑनलाईन बॅकअप बाबत अवगत करण्यात येणार असल्याचेही श्री बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.