जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार
जळगाव : जेष्ठ साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा शिरसोली तालुका जळगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय बौध्द महासभा, शिरसोली शाखे तर्फे नागरी सत्कार करण्यात […]
जळगाव : जेष्ठ साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा शिरसोली तालुका जळगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय बौध्द महासभा, शिरसोली शाखे तर्फे नागरी सत्कार करण्यात आला .

सत्कारास उत्तर देताना वाघ यांनी सांगितले की समाजात अनेक लोक खूप अभ्यासु आहेत पण ते लिहित नाहीत , काही लोक खूप अभ्यास करुन लिहितात पण ते भाषण करित नाहीत त्या मुळे ती माणसं जनते समोर येत नाहीत , मी फार मोठा अभ्यासक नाही , फारमोठा लेखक नाही पण मी कमी अधिक प्रमाणात अभ्यास , लेखन व भाषण करीत असतो त्या मुळे आम्बेडकरी अनुयायी माझा व माझ्या सारख्यानचा सत्कार करीत असतात , आपण माझा सत्कार करुन माझ्यावर अधिक जबाबदारी टाकली आहे असे मी मानतो व ती जबाबदारी पार पाडन्याचा मी प्रयत्न करेल , असे विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध , शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षि शाहु महाराज , बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
सन्मानपत्राचे वाचन सुनील तायड़े , प्रास्ताविक बाबूराव इंगळे , सूत्रसंचालन पंडित वानखेडे , परिचय रविंद्र इंगळे , आभार संतोष दाभाड़े यांनी केले . कार्यक्रमास गावकरी मोठ्या संखेने हजर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शैलेश सोनवणे , हेमंत भालेराव , भीमराव इंगळे , देवानंद साळवे , सिद्धार्थ खराटे , रमेश मानसरे , वंदना इंगळे , कविता सोनवणे , संघमित्रा तायड़े , लीलाबाई भालेराव , मंगला इंगळे , ज्योती इंगळे , पुष्पा वानखेड़े यांनी परिश्रम घेतले .

About The Publisher
