दत्ता देशमुख
जाफराबाद -तालुक्यातील युवा शेतकरी शंकर गाडेकर यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत पिकविलेल्या सीताफळाला महाराष्ट्रसह इतर राज्यातून मागणी होत आहे. यातून शंकर गाडेकर यांना लाखो रूपयांचे उत्पन्न मिळत आहे.
जाफराबाद तालुक्यातील नळविहरा येथील तरुण तथा उपक्रमशील शेतकरी शंकर भिकाजी गाडेकर यांनी आपल्या गट नं 23 मध्ये तिन वर्षा आधी एका एकरात 325 सिताफळांच्या झाडांची लागवड केली होती. यात त्यांनी मिश्र फळबाग म्हणून गावरणार, निलम, तोतापरी सह विविध आंब्यांच्या कलमा देखिल लावल्या आहे. तर यावर्षी दसर्या नंतर सीताफळाची बाग फळांनी चांगलीच बहरलेली असून यावर्षी झाडोना पावशेर ते अर्धा किलो पर्यंतची फळ लगडलेली आहे.
ही सिताफळांची गुजरातेतील सुरत अहमदाबाद, चैनई, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, गेवराई आष्टीसह विदर्भातील बुलढाणा, चिखली, शेगाव खान्देशातील जळगाव जामोद जामनेर, कोकण, पश्चित महाराष्ट्र यासह विविध राज्य तथा शहरात मागणी होत आहे. रोजनिशी दोन ते तीन क्लिटंल सीताफळ हे कॅरेटने बाहेरगावी मार्केट साठी पाठवण्यात येत आहे. यावर्षी थाडेल्या फळाला 30 रुपये तर मोठ्या आकाराच्या तसेच पिकलेल्या सिताफळाला प्रतिकिलो 50 रुपये ठोकभाव मिळत असल्याचे फळबाग उत्पादक शंकर गाडेकर यांनी सांगितले. या बागेला कुठलाही खर्च नाव न लावता केवळ सेंद्रिय खतावर व नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली सीताफळे बाजारपेठेला पाठविले जातात. पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण शेती सीताफळ कलमांची लागवड करणार आहे. येणार्या वर्षांमध्ये आमची सीताफळे युरोप, इंग्लंड, थायलंड, दक्षिण आफ्रिकेच्या मार्केटला पाठविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
या फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून 3 हजार मिरचीच्या कलमांची देखील लागवड करण्यात आलेली असून घरातील सर्व सदस्य काटणी, तोडणी, खत, पाणी देण्यायासाठी सहकार्य करत असून या हंगामा किमान दोन लाखांच्याही वर उत्पन्न होईल. शेतीत असे नवनवीन प्रयोग केल्यास शेतकरी यांची उन्नती होईल अशी प्रतिक्रीया शंकर गाडेकर यांनी दिली.