वृत्तपत्रांची पडताळणी व दरवाढीचे भिजत घोंगडे ; सरकारला गरज नाही; पत्रकार संघटनांचा यात काही फायदा नाही?
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणाम राज्य सरकारकडुन शासन निर्णयाचा धडका काही दिवसांपासुन सुरु आहे. राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे. मात्र, यातून वृत्तपत्रे आणि पत्रकार सुटलेले दिसून येत आहे.
शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 च्या निर्णयानुसार दर दोन वर्षांनी महागाई निर्देशांची सांगड घालून वृत्तपत्रांना दरवाढ करण्याबाबत शासन आदेशात नमूद आहे. असे असले तरी मागील सहा वर्षांपासून याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे अनेकदा मागणी करण्यात आलेली आहे. त्यांन या मागणीकडे कानाडोळा केला आहे.
Advertisment
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ बैठकांचा धडाका सुरु असून गेल्या पंधरवाड्यात हजारो निर्णय घेण्यात आले आहे. यात विविध सामाजिक घटकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, वृत्तपत्रे आणि पत्रकार यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. वृत्तपत्राचे मालक-संपादक व पत्रकारांमध्ये यामुळे नाराजीचा सुर उमटला आहे.