मालमत्ता कराचा सदोपयोग शहरात लागणार तेराशे सीसीटीव्ही कॅमेरे

मालमत्ता कराचा सदोपयोग              शहरात लागणार तेराशे सीसीटीव्ही कॅमेरे

पनवेल दि १७ पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर १३०० सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे. कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष […]

पनवेल दि १७

पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर १३०० सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे. कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष यासाठी पालिका तब्बल १२० कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबत पालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे करा, अशी मागणी पोलीस विभागाकडून केली जात होती. नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हेही यासाठी आग्रही होते. आयुक्त भारंबे आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांची याबाबत चर्चा झाल्यानंतर सीसीटीव्ही लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षासोबत कॅमेऱ्यांची जोडणी केली जाईल. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यामध्ये महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षा यासाठी प्राधान्याने तरतूद केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
पनवेल पालिकेच्या मुख्यालयात कॅमेऱ्यांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष असेल. वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना मदत मिळेल. शहरात रस्त्याने पायी चालताना मोबाइल चोरी व मंगळसूत्र चोरीच्या घटना मागील दोन वर्षांत घडल्या आहेत या गुन्हेगारीला आत्ता आळा बसून आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांना चांगलीच मदत होणार आहे. या कामी १२० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे .

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

सोशल मीडियावरुन एबीपीच्या पोल मध्ये महायुती कि महाविकास आघाडी कोण बनवणार सरकार...
मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षकांचे रॅण्डमायझेशन, मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
परतूर विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; बॉम्ब शोधक, नाशक पथकासह प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केंद्राची पाहणी
जिल्ह्यात मतदानाच्या विक्रमी टक्केवारीत व्यापारी वर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान-सतीश पंच
मित्र - सहकाऱ्यांचे झाले नाहीं ते मतदारांचे काय होणार; कार्यकर्तेही संभ्रमात!
अब्दुल हाफिज यांना एक्सप्रेस हायवेने विधानसभेत पाठवा - शेख माजेद; अब्दुल हाफिज यांच्या प्रचार सभेत शेख माजेद यांची चौफेर फटकेबाजी 
जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणार्‍या घाटगेंना पाठींबा - मुधकरराजे आर्दड