युवा आदर्श : पनवेल
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील सीकेटी स्वायत्त महाविद्यालयातील जान्हवी ज्योती भास्कर हातमोडे या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनीला भारत, थायलंड, नेपाळ, श्रीलंका आणि अमेरिकेत कार्य करणाऱ्या प्रसिध्द मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जान्हवीचे कौतुक व अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भास्कर हातमोडे उपस्थित होते.