ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक

२० लाख ४५ हजार किमतीच्या १७ गाड्या केल्या हस्तगत

युवा आदर्श : पनवेल 

 

पनवेलसह खारघर, कळंबोली, सीबीडी, उलवा, वाशी, नेहरूनगर, बांद्रा , पंत नगर, खार आदी ठिकाणावरून १७ ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून त्यांच्या कडून जवळपास २० लाख ४५ हजार किमतीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.

         सिबीडी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी का MH 43 AE 6338 ही आयकर कॉलनी, सेक्टर २१/२२. सीबीडी बेलापूर येथून चोरी झाली होती.

सदर तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, यांच्या  मार्गदर्शनाखाली वपोनि संदेश रेवले, पोलीस निरीक्षक अरूण पवार, यांचे देखरेखीत सिबीडी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि सुरेश डाबरे, पोउपनि विष्णू वाघ, पोहवा पाटील,  पठाण, भोकरे, चव्हाण, पोना बंडगर, वाघ, साबळे, पोशि पाटील, पोशि पाटील आदींच्या पथकाने गुन्हयातील चोरी झालेल्या वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून घटनास्थळ व आजूबाजूचे परिसरातील सुमारे ५० ते ५५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत अशरफ आलम शेख (वय २१ वर्षे, रा. टाटानगर झोपडपटदी, सेक्टर १०) व त्याचा सहकारी रमजान अब्दुलमतीन शेख उर्फ पापा (वय २२ वर्षे टाटानगर, सेक्टर १०) या २ संशयित आरोपी निष्पन्न केले.

या संशयितांचा सदरील गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडून फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी हस्तगत करण्यात आली. अधिक तपासामध्ये त्यांच्या कडून चोरीच्या १७ गाड्या ज्याची किंमत २० लाख ४५ हजार इतकी आहे त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य 
समर्थांची साधना
सात दिवसांत चौकशी करून कारवाई - उपअधिक्षक आयुष नोपाणी ;  इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन 
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल; चौकशी समिती गठित
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम