पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलीसांची कारवाई
28 लाखांचा मुद्देमाल व दुचाकी जप्त
On
युवा आदर्श : पनवेल
सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मज्जाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्त वार्ता कोकण विभाग उत्तरेश्वर बडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पनवेल मधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला 20 लाख 6 हजार किंमतीला गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुटखा पान मसाला अशा तंबाखू युक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल व माल पोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.


Tags:
About The Publisher
