रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची निवड

अखेर तटकरेंची सरशी

मुंबई - राज्य सरकाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे व बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. जालन्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. 

तर बहुचर्चित असलेल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले हे इच्छुक असून सुद्धा त्यांना न देता तटकरे यांनी बाजी मारली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पालकमंत्र्यांच्या यादीत नसल्याने त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. संजय सिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य 
समर्थांची साधना
सात दिवसांत चौकशी करून कारवाई - उपअधिक्षक आयुष नोपाणी ;  इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन 
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल; चौकशी समिती गठित
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम