लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे डॉ.प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात डायलेसिस सेंटरचे उद्घाटन
भविष्यामध्ये पनवेल लायन क्लबचे मल्टिपल हॉस्पीटल बांधण्याचे मानस
On
युवा आदर्श : पनवेल
चॅरीटेबल संस्थेमार्फत प्रायोजक लायन डॉ.संजय पोतदार व अध्यक्ष ला. एस. जी चव्हाण, सेकेटरी लायन अशोक गिल्डा व लायन्स क्लबचे इतर सभासद यांच्या मदतीने आणि डॉ प्रभाकर पटवर्धन स्मृती रुगणालय याच्या सहकार्याने डायलसिस सेंटरचे उद्घाटन समारंभ नुकताच पटवर्धन हॉस्पीटलमध्ये पार पडला .

लायन संजय पोतदार यांनी म्हटले आहे की हॉस्पीटल बांधण्याची खूप तळमळ होती आणि त्याची सुरुवात आज झाली आहे याचा आम्हांला खूप आनंद झाला आहे. तसेच सर्व तळागळातील गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत योग्य दरामध्ये ही सेवा मिळेल आणि त्याचा फायदा त्यांना होईल. आणि पनवेलच्या गरजु लोकांना आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.
कार्यक्रमासाठी पनवेलचे नामांकित डॉक्टर दिपक कुलकर्णी, डॉ ययाती गांधी व इतर डॉक्टर्स हजर होते.
लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष ला. एस जी चव्हाण व सेक्रेटरी ला.अशोक गिल्डा यांनी समितीचे पदाधिकारी आणि हॉस्पीटल स्टाफ व डॉक्टर्स यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Tags:
About The Publisher
