युवा आदर्श : पनवेल
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल मालक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ता सुरक्षेचे महत्व, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंग याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन आणि रस्ता सुरक्षा अभियान प्रबोधन कार्यशाला करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मो.वा.नि. योगेश शितोळे आणि स. मो.वा.नि. प्रिती पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कल्याणी सुरज म्हात्रे, ब्रिजेश पटेल (जिल्हा सचिव, भाजप रायगड), किरण पाटील (उपाध्यक्ष, भाजप खारघर) आणि प्रवीण पाटील (माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका) आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. सपना पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) येथे करण्यात आले होते. या वेळी चेअरमन सुरज नरेश म्हात्रे, प्रिन्सिपल दीपकोर सैनि, मॅनेजमेंट इन्चार्ज रेवी शेलदार उपस्थित होते. या अभियानात मारिया मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रो. कुमारी दिपा कृष्णा भैरट ओमकार मोटर ड्रायव्हिंग स्कूल प्रो. शिल्पा, खारघर मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे गणेश सांगले आणि सागर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रो. सागर भद्रा यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच कार्यक्रमा दरम्यान मेडिकल कॅम्पचे आयोqजन देखील करण्यात आले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली.