भारतच चॅम्पियन्स; मालिकेत अजेय कामगिरी करत तिसर्यांदा जिंकली चॅम्पियन ट्रॉफी
भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. जडेजाने 49व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माने 76 धावा करत सामन्याचा सामनावीर ठरला.


न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा भारताच्या फिरकी चौकडीने आपली कामगिरी चोख बजावली. भारताच्या फिरकी विभागाने चांगली कामगिरी करत धावांवर अंकुश ठेवला आणि न्यूझीलंडला 251 धावांवर रोखलं. रचिन रवींद्र आणि विल यंगने किवी संघाला अर्धशतकी भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्माची रणनिती आणि भारताच्या फिरकी विभागाने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 37 धावा, डॅरिल मिचेलने 63 धावा आणि ब्रेसवेलने 53 धावांची खेळी केली.
भारताकडून कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्तीने 2 विकेट्स तर रवींद्र जडेजा-मोहम्मद शमीने 1-1 विकेट घेतली. रोहित शर्माने कमालीचे नेतृत्त्व करत संघाला विजय मिळवून दिला.

About The Publisher
