जालना । प्रतिनिधी - जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना तसेच साई काणे क्रिकेट अकॅडमी चा क्रिकेटपटू व तेज तर्रार गोलंदाज श्रेयस बटुले याची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रिकेट असोशिएशन जालनाच्या संघाकडून खेळत असताना ऋषिकेश काणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस बटूले याने भन्नाट गोलंदाजी करून खेळातील विशेषता गोलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, एमसीएसीएसीचे चेअरमन सचिन मुळे, एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी संतोष बोबडे, अपेक्स कौन्सिल मेंबर व टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन राजु काणे, जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष दिलीप शाह, रमेश मगरे, जॉइंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण, संतोष भारोटे, रमेश मांटे व साई काणे क्रिकेट अकॅडमीचे सर्व खेळाडू यांनी श्रेयस याचे अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.