जालना - सन 2024-25 यावर्षीपासून इयत्ता 10 वी व 12 वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील जिल्हा/विभाग/ राज्य/ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील पात्रता धारक खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे भरावयाचा आहे. जालना जिल्ह्यातील कोणत्याही खेळाडूचा ग्रेस गुणाचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून ऑफलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार नाही.
आपले सरकार पोर्टलवरीती ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यापासून खेळाडू विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान भरपाईस सदर मुख्याध्यापक/प्राचार्य जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.
त्यानुसार जिल्ह्यातील सदर मुख्याध्यापक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांनी दि. 31 मार्च 2025 पर्यंत आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईनवर ग्रेस गुणाचे अर्ज करण्यात यावे असे आवाहन संजय गाढवे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.