बांधकाम परवानगी व लेआउट मंजुरीसाठी आता एक खडकी योजना कार्यान्वित होणार; जालना क्रेडाईच्या कार्यक्रमात जिल्हा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर यांची माहिती

बांधकाम परवानगी व लेआउट मंजुरीसाठी आता एक खडकी योजना कार्यान्वित होणार; जालना क्रेडाईच्या कार्यक्रमात जिल्हा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर यांची माहिती

जालना । प्रतिनिधी – बांधकाम व्यावसायिक , अभियंत्यांना आवश्यक असणार्‍या बांधकाम परवानग्या आणि लेआउट मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासह या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी 15 मार्चपासून एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती जिल्हा नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर यांनी येथे बोलताना दिली.

नगररचना आणि स्थापत्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या अभियंता आणि अधिकार्‍यांना रायगड किल्ल्याचे निर्माते हिरोजी इंदुलकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदलकर पुरस्कार नगररचना सहाय्यक संचालक सुमेध खरवाडकर यांना प्रदान करण्यात आल्याबद्दल जालना क्रेडाईतर्फे त्यांचा बुधवार दि. 5 मार्च रोजी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी कार्यान्वित केल्या जाणार्‍या एक खिडकी योजनेची माहिती दिली. प्रारंभी जालना क्रेडाईचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, माजी अध्यक्ष संजय मुथा, उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पवार, सचिव अविनाश भोसले यांनी श्री. खरवडकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित असलेले नगर रचनाकार अंगद, मोराळे, महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार श्रीकांत गीते, रोहित घोरपडे, श्रीमती तेजस्वी शिंदे, धनंजय वसु, रुपेश मापारी यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी श्री. खरवडकर पुढे म्हणाले की, एक खडकी योजनेमुळे आता कोणत्याही परवानग्यांसाठी अनेक टेबलवर जाण्याचे आवश्यकता राहणार नाही. एका ठिकाणी ही सर्व प्रक्रिया केली जाणार असल्याने, कामे विनाविलंब आणि आणि गतिमान होतील. समन्वयासाठी जालना क्रेडाईने पाच सदस्य समिती गठीत करावी, असे त्यांनी सुचविले. प्रारंभी त्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. परिपूर्ण प्रस्ताव नसणे, अस्पष्ट दस्तऐवज अपलोड करणे, काही कागदपत्रांची पूर्तता नसणे यामुळे मंजुरी देण्यात विलंब होतो. मात्र, आता एक खिडकी योजनेमुळे सर्व अडचणी दूर होतील आणि ही प्रक्रिया गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकपर भाषणात अभय कुलकर्णी म्हणाले की, श्री. खरवडकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे म्हणजे जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. बांधकाम व्यवसाय हा सरकारला उत्पन्न तर हाताला काम देणारा व्यवसाय आहे. अनेक चढउतार, अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र आपण सर्वांनी हातात हात घालून काम केले तर अडचणी दूर होतात, त्यामुळेच अधिकार्‍यांसमवेत संवादाला आम्ही प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शरद जयस्वाल, रवींद्र हुसे, चेतन मराठे, रितेश मंत्री यांच्यासह जालना क्रेडाईचे सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LatestNews

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ई-बाईकचा पर्याय; मंत्रिमंडळ निर्णय
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास
करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी; उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस