मंठा शहरात भव्य आदीयोगी (महादेव) मूर्ती स्थापना; शिवालय प्राईड भव्य प्लॉटिंग शुभारंभ

मंठा शहरात भव्य आदीयोगी (महादेव) मूर्ती स्थापना; शिवालय प्राईड भव्य प्लॉटिंग शुभारंभ

मंठा । प्रतिनिधी - मंठा शहरात महाशिवरात्रीच्या पाश्वभूमीवर भव्य दिव्य अशी आदियोगी (महादेव ) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शिवालय प्राईड च्या संयुक्त विद्यमाने भव्य प्लॉटिंग चा शुभारंभ व महाप्रसादाचे आयोजन मंठा शहराचे मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान न.प. गटनेते नितीन राठोड यांच्या पुढाकाराने व्यवस्थापक अविनाश खांडेकर, अनुप आबड, ओमप्रकाश पेरे, सचिन जैवळ, मयूर गोरे यांच्या प्रमुख सहकार्‍याने भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांनी भेट दिली श्री आदियोगी चे दर्शन घेऊन नितीन राठोड यांना आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मनमोहक , आकर्षक अश्या आदियोगी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्या बद्दल विशेष कौतुक केले शिवालय प्राईड चे आयोजक व व्यवस्थापक यांच्या हस्ते आमदार लोणीकर यांचा स्वागत सत्कार यावेळी करण्यात आला.

या भव्य दिव्य सोहळ्यास विधानपरिषद सदस्य आ.राजेश राठोड, नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे, जि.प.सदस्य पंजाब बोराडे, नगरसेवक शेख साजीद, नगरसेवक सचिन बोराडे, नगरसेवक शेषनारायण दवणे, नगरसेवक विकास सुर्यवंशी,नगरसेवक राजेश खंदारे, मा.उपनगराध्यक्ष जे.के भाई कुरेशी, नगरसेवक बाज पठाण, नगरसेवक प्रल्हादराव बोराडे, यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

LatestNews