छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या बस सेवा सुरु करा - कोलते

छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या बस सेवा सुरु करा - कोलते

जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या आराम, ईलेक्ट्रीकॅल्स, शिवशाही बस सेवा सुरु करून जिल्ह्यातील भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्वातंत्र सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी विभाग नियंत्रक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

 विभाग नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या आराम, इलेक्ट्रिकल्स, शिवशाही बस सेवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरु करावी, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा धार्मिक व साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जातो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक धार्मिक संस्थाचे कामे मोठ्या प्रमाणावर होत असून जिल्ह्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आयोध्याला जाण्यासाठी सध्याची परिवहन व्यवस्था जास्त प्रमाणात खासगी स्वरुपाची असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगारातून छत्रपती संभाजीनगर ते आयोध्या आराम बस, इलेक्ट्रिकल बस व शिवशाही बस सेवा सुरु केल्यास छत्रपती संभाजीनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील भाविक पर्यटक यांच्यासाठी लाभदायी ठरेल त्याचबरोबर परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.

निवेदनाचा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांचा हिताचा विचार तात्काळ होऊन छत्रपती संभाजीनगर ते आयोध्या बस सेवा सुरु करावी अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

LatestNews

छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या बस सेवा सुरु करा - कोलते
चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजेनंतर भरविण्याच्या शासन निर्णयाला हरताळ अंमलबजावणी न झाल्यास मराठा महासंघ आंदोलन छेडणार-अरविंद देशमुख
सोशल मीडियावरुन एबीपीच्या पोल मध्ये महायुती कि महाविकास आघाडी कोण बनवणार सरकार...
मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षकांचे रॅण्डमायझेशन, मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
परतूर विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; बॉम्ब शोधक, नाशक पथकासह प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केंद्राची पाहणी
जिल्ह्यात मतदानाच्या विक्रमी टक्केवारीत व्यापारी वर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान-सतीश पंच
मित्र - सहकाऱ्यांचे झाले नाहीं ते मतदारांचे काय होणार; कार्यकर्तेही संभ्रमात!